महापौरांच्या हस्‍ते मंजू सराठे यांच्‍या काव्‍यसंग्रहाचे प्रकाशन - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

07 May 2018

महापौरांच्या हस्‍ते मंजू सराठे यांच्‍या काव्‍यसंग्रहाचे प्रकाशन


मुंबई - कामराजनगर बृहन्‍मुंबई महापालिका हिंदी शाळेच्‍या शिक्षिका मंजू सराठे यांच्‍या ‘सप्‍तरंगी काव्‍य छटा’ या मराठी व ‘ख्वाहिश’ या हिंदी अशा दोन काव्‍यसंग्रहाचे प्रकाशन महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या हस्‍ते महापौर निवासस्‍थानी पार पडले. याप्रसंगी मुख्‍याध्‍यापक हवलदार सिंह, संतोष शर्मा, गुरुदत्‍त वाकदेकर, रश्‍मी सराठे, रवींद्र खरे उपस्‍थित‍ होते. सराठे यांना साहित्‍य क्षेत्रातील उल्‍लेखनिय कार्यासाठी विविध पुरस्‍कारांसोबत महापौर पुरस्‍कार सुध्‍दा प्राप्‍त झाला आहे. याप्रसंगी शिक्षिका मंजू सराठे यांनी महापौर निधीसाठी पाच हजार रुपये भेट दिले. सराठे यांनी शिक्षण व साहित्‍य क्षेत्रात उत्‍तरोत्तर प्रगती करावी, अशी सदिच्‍छा महापौरांनी दिली.

Post Top Ad

test