Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुंबई १०० टक्के स्वच्छ नाही - महापौर


मुंबई - केंद्र सरकारच्या 'स्वच्छता सर्वेक्षण २०१८' या सर्वेक्षणांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला देशभरात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. मुंबईचा स्वच्छ शहर म्हणून गौरव होताना नेमकी परिस्थिती वेगळी असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणल्यावर मुंबई १०० टक्के स्वच्छ नसल्याची कबुली महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. यामुळे केंद्र सरकारकडून मुंबईचा स्वच्छ शहर म्हणून झालेल्या गौरवाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

केंद्र सरकारने देशभरातील राजधान्यांमधून स्वच्छ शहर म्हणून मुंबईचा गौरव केला आहे. स्वच्छ मुंबईसाठी नागरिकांनी केलेल्या सहकार्याकरिता आयुक्तांनी मुंबईकरांचे आभार मानत; महापालिकेचे सफाई कामगार, कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी रात्रंदिवस केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे, या शब्दांत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कौतुक केले आहे. आयुक्तांनी कौतुक केल्यानंतर महापौरांनीही पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांचे, अधिकाऱ्यांचेआणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र यावेळी पत्रकारांनी कालच पाहणी करताना नाले साफ नसल्याचे व मुंबईत अनेक ठिकाणी कचरा साचल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणले. शहरात १०० टक्के स्वच्छता नसताना शहराचा स्वच्छ शहर म्हणून गौरव कसा झाला असा प्रश्न उपस्थित केल्यावर मुंबई १०० टक्के कधीच स्वच्छ नसते, झोपडपटटी विभागात कचरा साचलेला असतो त्याठिकाणी स्वच्छता करण्याचे काम सुरु आहे. कचरा वर्गीकरणाबाबत मुंबईकर सजग झाला आहे. झोपडपट्टी विभागात मात्र स्वच्छता नसल्याचे चित्र असले तरी त्यावर आम्ही मात करू असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. पालिकेकडून वर्षानुवर्षे स्वच्छतेचे काम केले जात आहे त्याचा निकाल केंद्र सरकारने दिला आहे. त्यासाठी महापौरांनी खास करून मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे. 

जबाबदारी झटकत नाही - 
मुंबईतील नालेसफाई झालीच नाही असे नाही. नालेसफाईचे काम धिम्यागतीने सुरु आहे. प्रभावी काम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मुंबईत मेट्रोच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी पालिकेच्या मलनि:सरण व पर्जन्य जलवाहिन्यांची तोडफोड केली आहे. या वाहिन्यांची तोडफोड केल्याने मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. हा आरोप नसून परिस्थिती सांगितल्याचा खुलासा महापौरांनी केला. एमएमआरडीए प्रशासन राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारावी. इतर ठिकाणची जबाबदारी आम्ही स्वीकारत असल्याचे महापौरांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom