पी. अभय कुमार यांनी आपल्या वाढदिवशी घोषित केला नवा चित्रपट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2018

पी. अभय कुमार यांनी आपल्या वाढदिवशी घोषित केला नवा चित्रपट


मुंबई - संतोष खामगांवकर
हिंदी चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य निर्माते पी.अभय कुमार हे एक नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘वो कौन है-दि मर्डर मिस्ट्री’, असे या चित्रपटाचे नाव असून त्यांच्या वाढदिवशीच त्यांनी या चित्रपटाची घोषणा केलीय. मंगळवार, 1 मे रोजी पी. अभय कुमार यांनी जुहूच्या सिटिझन हॉटेलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याचवेळेस त्यांनी त्यांच्या या सिनेमाची घोषणा केली. यावेळी विजू खोटे, विजय कदम, मुकेश तिवारी, विजय पाटकर, वृषाली गोसावी आदी कलाकार मंडळी उपस्थित होते.

पी. अभय कुमार यांनी आजवर अनेक चित्रपट निर्माण केले आहेत. लघुपट बनवण्यातही अभय कुमार अग्रेसर असतात. क्राईम, विनोदी, भयपट, ड्रामा, रोमान्स अशा विविध विषयांवर त्यांनी आजवर चित्रपट बनवले आहेत. यू ब्लडी फूल, बद्रीनाथ एलएलबी, टीट फॉर टॅट 2, लव्हर बॉय, ब्लाईंड लव्ह अशी कित्येक कलाकृती त्यांनी एसपी फिल्म्स अंतर्गत सादर केली आहेत. आता त्यांचा ‘वो कौन है- दि मर्डर मिस्ट्री’ हा नवा चित्रपट येणार आहे. डी.के.बर्नवाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून विजू खोटे, विजय कदम, मुकेश तिवारी, विजय पाटकर, वृषाली गोसावी आदी कलाकार मंडळी या चित्रपटात दिसणार आहेत. तसेच, मे महिन्यात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार असल्याचेही सांगण्यात अाले अाहे.

Post Bottom Ad