सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांना 'ऑफिसर ऑफ द मंथ' बहुमान - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

06 May 2018

सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांना 'ऑफिसर ऑफ द मंथ' बहुमान

मुंबई - महापालिकेच्या 'ई' विभागातील नागपाडा जंक्शन परिसराचे सुशोभीकरण करणारे, 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' येथील पेंग्वीन दर्शन इमारत परिसराचे सुशोभिकरण व आकर्षक लॅण्ड स्केपींग यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबविणारे तसेच अतिक्रमणांसह विविध अनधिकृत बाबींबाबत ठाम भूमिका घेऊन कार्यवाही करणारे 'ई' विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांचा 'मे २०१८' साठी "ऑफिसर ऑफ द मंथ" या बहुमानाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालायातील पेंग्वीन ईमारतीच्या सभागृहात आयोजित मासिक बैठकी दरम्यान गायकवाड यांचा 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (परिमंडळ १) विजय बालमावर यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. साहेबराव गायकवाड हे ऑगस्ट १९८७ पासून महापालिकेच्या सेवेत असून मे २०१४ पासून ते सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. सुरुवातीला 'आर दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त असणारे गायकवाड हे ऑक्टोबर २०१७ पासून 'ई' विभागाचे सहाय्यक पदाची जबाबदारी पार अडत आहेत. सध्याच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यासह विविध अनधिकृत बाबींबाबत सातत्याने ठाम भूमिका घेत कारवाई केली आहे. त्याचबरोबर नागपाडा जंक्शनसारख्या ऐतिहासिक परिसराचे प्रस्तावित सुशोभिकरण देखील गायकवाड यांच्याच कार्यकाळात मार्गी लागले आहे. महापालिकेच्या 'ई' विभागामध्ये भायखळा, चिंचपोकळी, नागपाडा, काळाचौकी, शिवडी, रे रोड, लकडी बंदर, डॉकयार्ड रोड, भंडारवाडा, ताडवाडी, जे, जे. रुग्णालय, मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा यासारख्या परिसरांचा समावेश होतो.

Post Top Ad

test