पालिका मानखुर्द पीएमजीपी नाल्यावर पादचारी पूल बांधणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2018

पालिका मानखुर्द पीएमजीपी नाल्यावर पादचारी पूल बांधणार


रहिवाशांची गैरसोय दूर होणार -
मुंबई - गोवंडी - मानखुर्द साठे नगर व पीएमजी कॉलनीतील रहिवाशांना रोज ये जा करताना लांबचा फेरा करून नाला ओलांडावा लागत होता. रहिवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मानखुर्द येथील पायलॉनजवळ असलेल्या पीएमजीपी नाल्यावर पालिकेने पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका या नाल्यासाठी पाच कोटी 31 लाख रुपये खर्च करणार आहे.

एम पूर्व विभागातील गोवंडी - मानखुर्द येथे पीएमजीपी नाला आहे. हा नाला ओलांडण्यासाठी साठे नगर व पीएमजीपी कॉलनीतील रहिवाशांना हा नाला ओलांडण्यासाठी दूरचा वळसा घ्यावे लागतो. याकडे पालिकेने लक्ष वेधले असून या नाल्यावर पादचारी पूल बांधण्याचे प्रस्ताविले आहे. यासाठी कामाचा आराखडा अंदाज आणि संकल्पचित्रे तयार करण्यासाठी मे. एस. एन. भोबे अॅण्ड असोसिएशटस प्रा. लि. यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या पुलाच्या बांधकामाचे काम मे. ए. पी. आय. सिव्हीलकॉन प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी पाच कोटी एकतीस लाख चार हजार आठशे एकोणचाळीस रुपये खर्च केला जाणार आहे. सदर कामाचा कंत्राट कालावधी पावसाळा सोडून एक वर्षाचा असणार आहे. येत्या स्थायी समितीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Post Bottom Ad