काळ्या यादीतील प्रजाकडून नगरसेवकांची केरळ टूर - JPN NEWS

Web News Portal - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

15 May 2018

काळ्या यादीतील प्रजाकडून नगरसेवकांची केरळ टूर


मुंबई - मुंबई महापालिकेकडून आरटीआयमध्ये माहिती मिळवून प्रशासन आणि नगरसेवकांच्या कामाचे वाभाडे काढणाऱ्या प्रजा फांऊडेशनला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. काळ्या यादीत टाकण्यात आल्यानंतर प्रजा फाऊंडेशनने मात्र नगरसेवकांना हाताशी धरून प्रशासनावर आपला वाचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी प्रजाने विविध पक्षातील आठ नगरसेवकांना अभ्यास दौरा म्हणून केरळ टूरला पाठवले आहे.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांसाठी दरवर्षी अभ्यास दौरा आयोजित केला जातो. यंदा प्रजा फाऊंडेशनने नगरसेवकांसाठी केरळमध्ये अभ्यास दौरा घडवून आणला आहे. त्रिशूल महापालिका, पुण्यातील यशदा प्रमाणे तेथील केरळ मधील येव्हीन्यू ऑफ लोकल असोशिएशन मध्ये राजकारणाचे धडे दिले जातात तेथेही भेटी दिली जाणार आहेत. केरळमध्ये त्रिशूल महापालिका २००० सुरु झाली. लोकसंख्या साडेतीन लाख असून ६० कोटीचा अर्थसंकल्प तर ६५ नगरसेवक आहेत. महापालिकेची माहिती नगरसेवकांना करुन दिली जाणार आहे. शिवाय, येथीस मेअर ईन काऊंसिल कशी चालते. स्वच्छतेची पहाणी, तेथे कुटुंब श्री या बचत गटाची माहिती दिली जाणार आहे. महापौर, उप महापौर, गटनेते, समिती अध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. पाणी पुरवठा प्रकल्पाला भेटी दिल्या जाणार आहेत. १८ मे रोजी हा दौरा संपणार अाहे. शिवसेनेकडून संजय घाडी व सचिन पडवळ, भाजपच्या रेणू भसीण, कॉंग्रेसचे विठ्ठल लोकरे व विरेंद्र लोकरे, राष्ट्रवादीच्या शायरा आझमी व नाझीरा शेख, सपा शायरा शेख रुकसाना व सिद्दीकी तर प्रजा फांउडेशनतर्फे श्रृती शर्मा, मिलिंद म्हस्के, बळवंत किरार आणि जेनिफोर स्पेनफर आदी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत. मंगळवारी या नगरसेवकांचे १० ते १२ यावेळेत एक सत्र झाले. दरम्यान, त्रिशूल महापालिकेचे कामकाज कसे चालते, याची माहिती देण्यात आली. दरम्यान, प्रजा फाउंडेशनला महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. शिवाय, फाऊंडेशनेकडून दिली जाणारी माहिती खोटी असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले होते. त्यामुळे धास्तावलेल्या प्रजाने नगरसेवकांना हाताशी धरल्याचे बोलले जात आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here