पावसाळ्यात रेल्वे ठेवणार हवामान खात्याशी संपर्क - JPN NEWS

Web News Portal - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

03 May 2018

पावसाळ्यात रेल्वे ठेवणार हवामान खात्याशी संपर्क

मुंबईत - येत्या एक महिन्यात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबई हवामान विभागाशी संपर्कात राहून मोठ्या प्रमाणात पाऊस व भरती असल्यास लोकलच्या फेऱ्या कमी प्रमाणात चालवण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वेचे डिव्हीजल मॅनेजर संजय जैन यांनी दिली.  

पावसाळ्यात मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते आणि प्रवाशांनाही त्रास होतो. पावसाळ्यात प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी पावसाचा अंदाज घेत लोकलच्या फेऱ्या कमी चालण्यात येणार आहेत. मुंबईत कधी जास्त पाऊस पडणार याची माहिती मुंबई हवामान विभागाकडून घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. येत्या चार दिवसात हवामान विभागाबरोबर बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती जैन यांनी दिली.  

Post Bottom Ad

Responsive Ads Here