Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शारदाश्रम शाळेत दोन दिवसांत एसएससी बोर्डाचे प्रवेश सुरु करा - मंगेश सातमकर


मुंबई - दादर येथील शारदाश्रम शाळेचे नाव गेले काही दिवस चर्चेत आहे. शाळेने आपली मराठी शाळा बंद करून एम्ग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे पडसाद शिक्षण समितीत उमटल्यावर गुरुवारी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी शाळेला भारत दिली. या भेटीत एसएससी बोर्डाची २०२० पर्यंत मान्यता असताना एसएससी बोर्ड शारदाश्रम व्यवस्थापनाकडून बंद केले जाऊ शकत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शारदाश्रम शाळेत एसएससी बोर्डाचे प्रवेश सुरु करावेत, असे आदेश सातमकर यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान दोन दिवसांत विद्यार्थ्यांचे एसएससी बोर्डाचे प्रवेश न घेतल्यास पालकांसोबत शिवसेना स्टाईल आंदोलन करु असा इशारा यावेळी शिवसेनेने दिला. 

शारदाश्रम ही सचिन तेंडुलकर याची शाळा म्हणून प्रसिद्ध अाहे. शारदाश्रमचे नाव बदलून एस. व्ही. एम इंटरनॅशनल स्कूल असे केले जाणार होते. शिक्षण समितीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता शाळेची पटसंख्या चांगली आहे. शाळेला २०२० पर्यंत मंजुरी दिलेली आहे. तरीही मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप समितीत करण्यात आला होता. मराठी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले देण्यात आले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश हवा असल्यास घ्या असे पालकांना सांगण्यात आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातारण पसरले असल्याचे यावेळी निदर्शनास आणण्यात आले. शारदाश्रम शाळेचे नाव एस. व्ही. एम इंटरनॅशनल स्कूल करण्यास शिक्षण उपसंचालकांनी मंजुरी दिली असली तरी आरटीई कायदयानुसार पालिकेची परवानगी घेण्यास सांगण्यात आले. शारदाश्रम या नावाने आरटीईनुसार परवानगी मागणी केली असताना पालिकेच्या शिक्षण विभागाने मात्र एस. व्ही. एम इंटरनॅशनल स्कूल या नावाने परवानगी दिली. पालिकेच्या शिक्षण समितीमध्ये नाव बदलाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नसताना शिक्षण विभागाने आधीच नव्या नावाने एनओसी मिळाल्याने चौकशी करण्याची मागणी साईनाथ दुर्गे, शीतल म्हात्रे, सईदा खान, सचिन पडवळ यांनी केली होती. यावर बिट आँफिसरला निलंबित करण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्षांनी देत, शालेय प्रशासनाने इंग्रजी करता नवे वर्ग बांधण्याची सूचना केली होती.पालकांनीही याबाबत शिक्षण समितीकडे तक्रारी केल्या होत्या. यापार्श्वभूमीवर एसएससीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश सातमकर यांनी दिले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom