शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 14 मे रोजी जेलभरो - JPN NEWS

Web News Portal - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

08 May 2018

शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 14 मे रोजी जेलभरो


मुंबई - बेळगाव सह महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यात हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा पूर्ण करून राज्य शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यासाठी 14 मे रोजी राज्यव्यापी जेलभरो सत्याग्रह करण्यात येणार असल्याचा इशारा सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील यांनी दिला. 

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कर कर्जा नाही देंगे बिजली का बिल भी नाही देंगे, अन्न दात्यासाठी अन्नत्याग धरणे आणि हुतात्मा अभिवादन शेतकरी यात्रा या तीन कार्यक्रमांनंतर सुकाणू समिती जेलभरो आंदोलन करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्यकर्त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण व सरसकट कर्जमुक्ती, वीज बिल मुक्ती, शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा इतका हमी भाव मिळण्याची स्वामीनाथन शिफारशीची अंमलबजावणी, शेतकरी विरोधी आयात-निर्यात धोरण बदलणे, आदिवासी व इतर जंगल निवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, अन्यायकारक भूसंपादन रद्द करणे, नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करावा इत्यादी मागण्यासांठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच 14 मे रोजी राज्यव्यापी जेलभरो सत्याग्रह आंदेलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात दोन लाखांहुन अधिक शेतकरी सहभागी होणार असून सत्याग्रह नोंदणी फॉर्म भरुन घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती समिती सदस्य किशोर ढमाले यांनी दिली. या आंदोलनात शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघ, सत्यशोधक शेतकरी सभा, अखिल भारतीय शेतकरी संघ, अखिल भारतीय किसान सभा, लोकसंघर्ष मोर्चा, स्वराज्य इंडिया, जनता दल, कष्टकरी शेतकरी संघ अशा विविध संघटना सहभागी होणार असल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here