धोबीघाट कारवाई - शिवसेनेचे सोमवारी आयुक्तांच्या दालनात आंदोलन - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

06 May 2018

धोबीघाट कारवाई - शिवसेनेचे सोमवारी आयुक्तांच्या दालनात आंदोलन

मुंबई - महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना आमनेसामने आले आहेत. पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने संतप्त झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षा किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी पालिका आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महालक्ष्मी स्टेशनजवळ जवळील धोबीघाट मुंबईत येणा-या पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण. गेली सव्वाशे वर्ष हा धोबी अस्तित्वात आहे. धोबी घाट परिसरात कपडे धुण्यासाठी व छोट्या पायवाटा आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये या पायवाटांवर अतिक्रमणे; तर काही हौदांवर अनधिकृत बांधकामे झाली होती. याचबरोबर काही ठिकाणी अनधिकृत 'शेड' देखील उभारण्यात आले होते. त्यामुळे या धोबी घाट परिसरात कपड्यांचे गाठोडे घेऊन येणा-या - जाणा-यांना चालण्यास अडथळे येत होते. महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभागाने मुंबई पोलीसांच्या सहकार्याने ४३ अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. हि कारवाई थांबवायचं प्रयत्न करणाऱ्या सहा लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान अनिधकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळे धोबीघाटमधील नागरिकांच्या बाजूने शिवसेना उतरली आहे. धोबी घाट परिसरातील धोब्यांचे १ वर्षांपूर्वी पुनर्वसन कर्णाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुनर्वसन केले नसल्याने ज्या ठिकाणी कपडे सुखावले जातात त्या रश्यांच्या बाजूला तात्पुरता स्वरूपाची शेड्स बांधली होती. ती शेड्स पालिकेने तोडली आहेत. पालिका अधिकारी बिल्डरांची सुपारी घेऊन या गरेब धोब्यांवर कारवाई करत असल्याने पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांविरोधात सोमवारी पालिका आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. दरम्यान २०१५ आधी पासून जी दक्षिण या विभागात असलेल्या डेसिग्नेशन ऑफिसर व इतर अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी पेडणेकर यांनी केली आहे.

सहाय्यक आयुक्त अफझल खानाची औलाद - 
पालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना अशाच प्रकरणात अंधेरी आणि बोरीवली येथून धक्के नमारून हाकलून दिले होते. या अधिकाऱ्याने आता गरीब धोब्यांवर कारवाई केली आहे. गरिबांवर हातोडा मारणाऱ्या या अधिकाऱ्यांना कमला मिल सारख्या अनधिकृत बांधकामनवर कारवाई करता येत नाही. सहाय्यक आयुक्त बिल्डरची सुपारी घेऊन कारवाई करत असल्याने हा अफझल खानची औलाद आहे. या अधिकाऱ्याविरोधात आंदोलन करणार.
- किशोरी पेडणेकर, नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा

Post Top Ad

test