बकेट लिस्ट चित्रपटाचा ट्रेलर लाँच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 May 2018

बकेट लिस्ट चित्रपटाचा ट्रेलर लाँच


ट्रेलरमधून माधुरीबरोबर दिसली रणबीरची ही झलक -
मुंबई - संतोष खामगांवकर -
प्रेक्षक आवर्जून वाट पाहत असलेल्या बकेट लिस्ट चित्रपटाचा ट्रेलर माधुरी दिक्षित आणि करण जोहर यांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडला. यावेळी माधुरीबरोबरच सुमित राघवन, वंदना गुप्ते, शुभा खोटे, प्रदीप वेलणकर, सुमेध मुद्गलकर आणि इतर कलाकार मंडळी उपस्थित होती. तर चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर आणि चित्रपटाचे निर्माते जमाष बापुना, अमित पंकज पारिख, अरूण रंगाचारी, विवेक रंगाचारी, आरती सुभेदार आणि अशोक सुभेदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

प्रेक्षकांना आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या बकेट लिस्ट सिनेमाच्या ट्रेलरचं वैशिष्ट्य म्हणजे यात दिसलेली रणबीरची झलक... त्यामुळे माधुरीबरोबरच रणबीरचे चाहतेही सुखावले आहेत. डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ करणच्या वाढदिवशी म्हणजेच 25 मे ला जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसलेली ही बॉलिवूडची मराठमोळी अप्सरा बकेट लिस्ट चित्रपटातून प्रेक्षकांना हसत-खेळत जगण्याची नवी भाषा शिकवून जाणार आहे, एवढं नक्की.

Post Bottom Ad