Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कुर्ला, घाटकोपरमधील नागरिकांनी ७ ते १४ मे पाणी उकळून प्यावे


मुंबई - घाटकोपर उच्‍चस्‍तरीय जलाशयाच्‍या पाण्‍याची टाकी क्रमांक २ च्‍या दुरुस्‍तीचे काम पूर्ण झाले असून सदर जलाशय ७ मे पासून कार्यान्वित करण्‍यात आले आहे. याकारणाने पुढील सात दिवस म्‍हणजेच १४ मे पर्यंत कुर्ला व घाटकोपरमधील नागरिकांनी पाणी उकळून व गाळून पिण्‍याचे आवाहन बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

एल विभागातील प्रभाग क्रमांक १५७, १६१ व १६४ मधील संघर्षनगर, खैराणी रोड दोन्‍ही साईड, सरदार कपाऊंड डिसुझा कंपाऊड, ऐयप्‍पा मंदिर मार्ग, लक्ष्‍मी नारायण मंदिर मार्ग,यादवनगर, राजीव नगर, अहमद रजा मार्ग, भानुशालीवाडी, कुलकर्णीवाडी, लोयल्‍का कंपाऊड, सुभाषनगर, बारदान गल्‍ली, इंदिरानगर, मोहिली पाईपलाईन, परेरावाडी, गणेश नगर, नारायण नगर, नारी सेवा सदन मार्ग, भीमनगर, आंबेडकर नगर, सानेगुरुजी नगर, सुंदरबाग, वाल्‍मि‍कीनगर, अशोकनगर, हिमालया सोसायटी, संजयनगर, समता नगर, गैबंशा स्‍कूल, नूराणी मस्‍जिद, गरीबी हटाव नगर, मुकुंद कपाऊंड. तसेच एन विभागातील प्रभाग क्रमांक १२३, १२७ आणि १३० मधील आनंदगड, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जय मल्‍हार नगर,खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टॅंक, डी आणि सी मनपा वसाहत, रायगड विभाजी, गांवदेवी, पठाण चाल, अमृत नगर, इंदिरा नगर २, अमिनाबाई चाल,काठोडी पाडा, भिमनगर, इंदिरा नगर १, अल्‍ताफ नगर, गेलदा नगर, जब्‍लुशा नगर, गोलीबार रोड, सेवा नगर, ओएनजीसी कॉलनी, माझगांव डाक कॉलनी, गंगावाडी गेट नगर २ विक्रोळी पार्क साईटचा काही भाग (म्‍हणजे आनंदगड उदंच्‍चन केंद्राव्‍दारे होणारा पुरवठा) सिध्‍दार्थ नगर, साईनाथनगर आणि रोहिदास रोड इत्‍यादी भागात गढूळ पाणी पुरवठा होण्‍याची शक्‍यता आहे. तरीही नागरिकांनी पाणी उकळून व गाळून पिण्‍याचे आवाहन बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom