Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बेस्टमधील १० हजार फुकट्यांकडून ९ लाखांचा दंड वसूल


मुंबई - बेस्ट बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या तसेच खरेदी केलेल्या तिकिटाच्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते एप्रिल २०१८ या चार महिन्यांत १० हजार ९७१ प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ९ लाख ९६ हजार ६६१ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. बसप्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट अथवा वैध बसपास घेऊन तिकीट व बसपासवर प्रमाणित केल्याप्रमाणे प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.

दंड आणि शिक्षा -
विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवास भाडे अधिक देय प्रवासी भाडे रकमेच्या दहापट भरणा करण्याचे नाकारल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलाम ४६० (ड ) अन्वये एक महिना पोलीस कोठडी किंवा रु. २००/- पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom