Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बेस्ट उपक्रमाचा तोटा वाढत चालला

मुंबई - बेस्ट उपक्रमाचा तोटा कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. बेस्टमधील बसचा दैनंदिन प्रवासाप्रमाणेच वाहतूक कोंडीसारख्या कारणांनी महसुलात घट होत चालली आहे. २०१७-१८ मध्ये बेस्ट उपक्रमाचा महसूल ११७ कोटी रुपयांनी कमी झाला असून, प्रत्येक बसचा सरासरी प्रवास १७० किमीपर्यंत घसरला आहे. बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाचा तिकीट महसूल ११७ कोटी रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यात प्रत्येक बसचे दररोजचे सरासरी अंतर १७० किमी इतके कमी झाले आहे. यापूर्वी काही कालावधीपर्यंत प्रत्येक बस दररोज सुमारे १८० किमी इतके अंतर कापत होती. मेट्रोच्या कामांप्रमाणेच वाहतुकीचा मंदावलेला वेग त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. बेस्ट उपक्रमाच्या एकूण महसुलात परिवहन विभागाचा महसूल १,३५९ कोटी रुपये आहे. अशातच बेस्टची प्रवसी संख्या घटून २५ ते २७ लाखांपर्यंत आली आहे. .

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom