दिव्यात मेलने दुचाकीला उडवले, दोघांचा मृत्यू

JPN NEWS

ठाणे - दिवा रेल्वे स्थानकाजवळ बंद फाटक ओलांडून जात असलेल्या दुचाकीला भरधाव नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसने उडवल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघा मृत तरुणांची ओळख अद्यापि पटली नसून अधिक तपास सुरू आहे. 

सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नागपूर सीएसटी सेवाग्राम एक्स्प्रेस जात असल्याने दिवा रेल्वे स्थानकाजवळील फाटक बंद होते. त्या वेळी ॲक्टिव्हावरून आलेल्या दोन तरुणांनी बंद फाटकातून जाण्याचा प्रयत्न केला. बंद फाटकाच्या खांबाखालून दुचाकी नेत असतानाच त्या वेळी भरधाव एक्स्प्रेसने त्या दोघांना उडवले. या धडकेत दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला तर दोघेही तरुण जागीच ठार झाले. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. दोघा मृत तरुणांच्या मृतदेहाजवळ कुठलेही ओळखपत्र अथवा इतर दस्तावेज आढळून आलेले नसल्याने दोघांची अद्यापि ओळख पटलेली नाही. मात्र, दोन्ही तरुण बिगारी कामगार असून ते दिवा नाक्यावर काम करतात, अशी देखील प्राथमिक माहिती समोर आली असून दिवा नाक्यावर काम करणाऱ्या इतर कामगारांकडे चौकशी करून दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !