गिरगाव कोठारी मेंशनला आग, एकाचा मृत्यू - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

24 June 2018

गिरगाव कोठारी मेंशनला आग, एकाचा मृत्यू

मुंबई - गिरगाव येथील कोठारी मेंशन या इमारतीला रविवारी सायंकाळी आग लागली. या आगीत दुसरा व तिसरा मजला जळाल्याने इमारतीचे काही बांधकाम आगीत कोसळले. या आगीत एकाचा मृत्यू झाला. कबीर आलम (२८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आहे.

गिरगाव, सेंट्रल प्लाझा सिनेमाजवळील, गोरेगावकर लेन येथील कोठारी मेंशन या तळापासून चार मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर रविवारी सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास आग लागली. क्षणार्धात आग भडकली आणि घटनास्थळी आगडोंब उसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. तोपर्यंत आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने लेव्हल ३ ची आग घोषित केली. ८ फायर इंजिन व ७ वॉटर टँकरच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या आगीत इमारतीतील दोन मजल्यांचे नुकसान झाले. सादर आगीबाबत अग्निशमन दल व पोलिसांकडून आधी तपास केला जात आहे.

Post Top Ad

test