AD BANNER

कुर्ला-शीव पादचारी पुलासाठी सह्यांची मोहीम

मुंबई - २६ मे रोजी मध्य रेल्वेने कुर्ला पश्चिमेतील अंबिकानगर आणि पूर्वेकडील स्वदेशी मिल, कसाई वाडा येथील स्थानिकांच्या वापरात असलेला पूल पाडला. रोज सुमारे दहा हजार प्रवासी पुलाचा वापर करत होते. कुर्ला परिसरातील नागोबा चौक, खंडाळा चाळ, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी आणि ताकिया वॉर्ड मार्केट येथे ये-जा करण्यासाठी हा एकमेव पादचारी पूल होता. तो पाडण्यात आल्यामुळे स्थानिकांना रेल्वे रूळ ओलांडावा लागत आहे. पुलाच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करावे, यासाठी मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमत अडीच हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. या प्रकरणी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा सार्वजनिक पादचारी पूल असल्यामुळे महापालिका आणि मध्य रेल्वे यांच्या समन्वयाने पूल उभारण्यात येणार आहे.
Previous Post Next Post