धोकादायक इमारतींसाठी म्हाडाचा नियंत्रण कक्ष

JPN NEWS
मुंबई - मुंबईत म्हाडाच्या अखत्यारीत १४,२८६ उपकरप्राप्त इमारती आहेत. जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेकरीता म्हाडाने २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. इमारत क्रमांक ८९-९५ रजनीमहलमध्ये म्हाडाकडून २४ तास चालणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षात उपअभियंता व कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी २४ तास हजर असणार आहेत. धोक्याची कोणतीही सूचना मिळाल्यास हे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन इमारतीची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करतील. तसेच महानगरपालिका नियंत्रण कक्षातर्फे प्राप्त झालेली माहिती त्वरीत म्हाडाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन पुढील आवश्यक ती कारवाई ही करतील. नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्यासाठी २३५३६९४५ / २३५१७४२३ किंवा ९१६७६५५२११२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे. 

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !