Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी 'धडक' चित्रपटातील संवादाचा वापर


मुंबई : मराठीतील सुप्रसीध्द असलेल्या 'सैराट' चित्रपटाचा 'धडक' या नावाने हिंदी रिमेक करण्यात आला आहे. 'धडक' चित्रपटातील संवादाचा वापर मुंबई पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी करण्याची शक्कल लढवली आहे. यातील नायक नायिकेच्या चेहऱ्यावर सिग्नल पाहत असल्याचे पोस्टर मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवर प्रदर्शित केले असून याची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू, असे ट्विट करून पोलिसांच्या या नव्या शक्कलला प्रतिसाद दिला आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि इशान खट्टरच्या 'धडक' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. अशातच ट्विटरवर आपल्या क्रिएटिव्हिटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांनी याच सिनेमातील एक डायलॉग वापरत ट्रॅफिक सिग्नलबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर एक दृश्य शेअर करण्यात आले आहे. ज्यामध्ये धडक सिनेमातील एक डायलॉग आहे, मात्र जान्हवी कपूरच्या जागी ट्रॅफिक सिग्नलचा फोटो आहे. धडकच्या ट्रेलरमध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये जान्हवी कपूर इशान खट्टरला म्हणते, क्या नाटक कर रहा है, मुझे देख क्यो नहीं रहा ? या डायलॉगचा वाहनचालकांमध्ये ट्रॅफिक सिग्नलबाबत जागरूकता पसरवण्यासाठी खुबीने वापर केला आहे. ट्विटरवर हे दृश्य शेअर करताना फोटोसोबत एक कॅप्शनही देण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे, ट्रॅफिक सिग्नलच्या भावनिक अंगाकडे दुर्लक्ष करू नका. ट्रॅफिक सिग्नल पाळणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर या ट्विटची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom