परळ स्थानकातील नवा प्लॅटफार्म वाहतुकीसाठी खुला

JPN NEWS

मुंबई - परळ टर्मिनसचे काम रखडले होते. एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर परळ टर्मिनसचे काम वेगात सुरू झाले. त्याचा भाग म्हणून रविवारी स. ८.३० ते दु. ४.३० पर्यंत आठ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक सायंकाळी ५.३० ते सहाच्या सुमारास संपुष्टात आला. ब्लॉकचे काम यशस्वी झाल्याने नवीन मार्गिका उपलब्ध झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून ठाण्याच्या दिशेने हेाणारी वाहतूक पुढील सहा महिन्यांसाठी बंद केली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मवरून होणारी वाहतूक नव्या मार्गिकेवर चालवली जाईल. नवीन मार्गिका सुरू झाली तरीही पादचारी पूल जोडण्यासाठी पायऱ्या उपलब्ध नसल्याने तीन ठिकाणी स्वतंत्र रॅम्प उभारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना जुना आणि नवीन प्लॅटफॉर्मवरून ये-जा करता येणार आहे. पुढील सहा महिन्यांत परळ टर्मिनस पूर्ण झाल्यानंतर ही मार्गिका बंद करून पुन्हा ही वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून सुरू केली जाईल. हा दुसरा टप्पा असून त्यात परळ टर्मिनस स्वतंत्रपणे सुरू होणार असून, जुन्या प्लॅटफॉर्मची रुंदी दोन मीटरने वाढवली जाईल. परळ आणि एल्फिन्स्टन स्थानकातून ३.५ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. शहरातील मुख्य रुग्णालये परळमध्ये स्थित आहेत. स्थानिकांसह रुग्णांच्या नातेवाइकांना प्रवासासाठी याचा विशेष फायदा होईल.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !