निर्भिड पत्रकारिता हा लोकशाहीचा प्राण - डॉ. सुधीर गव्हाणे - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 June 2018

निर्भिड पत्रकारिता हा लोकशाहीचा प्राण - डॉ. सुधीर गव्हाणे


मुंबई - निर्भिडपणे पत्रकारिता करता यावी यासाठी पोषक वातावरण असेल तर ते लोकशाहीसाठी शुभ संकेतच असतात. वंचितांना न्याय मिळणे हालोकशाहीचा प्राण आहे. तिच लोकशाहीची खरी व्याख्या आहे असे परखड मत माध्यम तज्ज्ञ व एमआयटी-विश्वशांती विद्यापीठ, पुणेचे संचालक, डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या 77 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. 

यावेळी बोलताना देशाला स्वातंत्र्यमिळण्यात पत्रकारांच्या मोठा सहभाग होता. आजच्या पत्रकारितेत भाटांचे प्रमाण वाढले आहे. ते लोकशाहीस घातक आहे. पूर्वी आपल्याबद्दल चांगली बातमी छापली म्हणून फोन यायचे आता चांगल्या बातमीबरोबरच विरोधकांचे वाईट छापण्यासाठी दबावाचे फोन सुध्दा येतात इथेच पत्रकारितेतील मुल्यांना ईजा होण्यास सुरुवात होते असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. 

सध्याच्या संस्थेत कार्यरत असताना एका दैनिकात संपादकपदाची संधी आपल्याला चालून आली होती. त्यावेळी आपली स्थिती दोलायमान झाल्याचे सांगुन गव्हाणे म्हणाले की, मला गुरुस्थानी असलेल्या डॉ. वाघमारे यांचे मार्गदर्शन घेतले असता ते म्हणाले की, ज्यात आनंद वाटेल व जो चिरकाल टिकेल असा पर्याय निवडा त्यावेळी विचार केला की, संपादक म्हणून 20-25 वर्षे पत्रकार म्हणून नोकरी करुन पत्रकारितेचा आनंदही मिळवता येईल. मात्र तो चिरकालीन नसेल निवृत्तीच्या काळात स्वस्थता लाभणार नाही. त्यापेक्षा आपण इथेच विद्यार्थ्यावर पत्रकारितेचे संस्कार घडवले तर अनेक पत्रकार निर्माण होतील तो आंनद मला अधिक स्वस्थता देणारा होता. त्यामुळे मी हा पर्याय निवडला. तळागाळातल्या कुटुंबातुन, समाजातून अनेक पत्रकार आज आपल्या संस्थेतून पत्रकारितेचे धडे घेवून बाहेत पडत आहेत. हा आनंद मला मन:स्वास्थ देतो व माझी पत्रकारितेची भूकही भागते. पत्रकार संघानेही प्रतिवर्षी निर्भिड व तरुण पत्रकारासाठी एखादा पुरस्कार जाहिर करावा असे ते म्हणाले. 

यावेळी अमोल सरतांडेल, संपादक, मासिक ‘दर्यार्वर्दी’ यांना मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार. दिवाकर शेजवळ, वृत्तसंपादक, दै. ‘सामना’ यांना ‘समतानंद अनंत हरि गद्रे’ पुरस्कार, प्रकाश पार्सेकर यांना तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार पुरस्कार तर मनोहर शिरोडकर यांना‘ कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार डॉ.सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, विश्वस्त प्रकाश कुलकर्णी, अजय वैद्य, वैजयंती कुलकर्णी-आपटे, कार्यवाह संदिप चव्हाण, उपाध्यक्ष सुधाकर काष्यप, स्वाती घोसाळकर व संयुक्त कार्यवाह सुरेश वडवळकर, लोककलेचे अभ्यासक प्रकाश खांडगे उपस्थित होते. पाहूण्यांचा परिचयप्रकाश खांडगे यांनी करुन दिला. प्रास्तविक अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी केले. तर कार्यवाह सुरेश वडवळकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालनस्वाती घोसाळकर यांनी केले.

Post Bottom Ad