मोदींच्या विदेशवारीवर ३५५ कोटी रुपये खर्च


बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४ वर्षात विदेशवारीवर ३५५ कोटी रुपये खर्च केले आहे. या चार वर्षात मोदी यांनी ४१ वेळा विदेश दौरे केले असून ५२ देशांना भेटी दिल्या. ४८ महिन्यांच्या कालावधीत मोदी १६५ दिवस देशाबाहेर होते. 

बंगळुरूतील आरटीआय कार्यकर्ते भिमाप्पा गदाद यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) नरेंद्र मोदींच्या विदेश यात्रांचा आणि त्यावर होणाऱया खर्चाचा तपशील विचारला होता. त्यात ही माहिती ‘पीएमओ’ने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जून २०१४ ला पहिला विदेश दौरा भुतानचा केला. भुतान दौऱयाचा खर्च सर्वात कमी २ कोटी ४५ लाख रुपये झाला. मोदींचा सर्वात महाग दौरा फ्रान्सचा ठरला आहे. या दौऱयात मोदींनी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाला भेट दिली. त्याचा खर्च ३१ कोटी २५ रुपये आला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षांत ६७ विदेश दौरे केले. त्याचा खर्च ६४२ कोटी झाला. पंतप्रधान मोदींच्या चार वर्षांतील ४१ विदेश दौऱयांचा खर्च ३५५ कोटी आहे. मात्र मोदी यांच्या देशांतर्गत दौऱयांचा तपशील आणि खर्चाची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव देण्यास पीएमओने नकार दिला आहे.

Tags