ठाण्यात अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिलेस अटक - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2018

ठाण्यात अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिलेस अटक


ठाणे - ठाण्यातील सिडको परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बसून अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिलेस ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ही दलाल महिला काही ग्राहकांशी फोनवरून संपर्क साधत त्यांना हाय प्रोफाईल मुली शरीरसंबंधासाठी पुरवत असे. तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून ती ग्राहकांना फॅमिली रेस्टॉरंटमध्ये बोलावून तेथे डिल करत असे, अशी माहिती ठाणे अनैतिक मानवी तस्करी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

हॉटेलमध्ये बसून फोनद्वारे एक महिला काही जणांना शरीरसुखासाठी महिला पुरवत असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी तस्करी विरोधी पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने या हॉटेलवर शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास छापा मारला. यावेळी हॉटेलमध्ये बसून ही महिला फोनवरून डिलिंग करत असताना आढळून आली. या महिलेस पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला काही तरुणींच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना शरीरविक्रय करण्यास भाग पाडत असल्याचे समोर आले आहे. यावेळी दलाल महिलेच्या ताब्यातून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या घटनेत दलालाच्या ताब्यातील तीन महिलांची सुटका करण्यात आली असून ठाणे नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post Bottom Ad