राज्यात ४ लाख शाळाबाह्य मुले, ३ हजार ७९६ एक शिक्षकी शाळा


नागपूर - राज्यभरात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांना शोधण्यासाठी शिक्षण विभागाने शाळाबाह्य सर्वेक्षण आयोजित केले होते. तर गत सात वर्षांपासून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानाही मे २०१८ पर्यंत प्राप्त माहितीनुसार, राज्यात ४ लाख मुले शाळाबाह्य असल्याचे समोर आले आहे. विधानसभेमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांसंदर्भात विचारलेल्या या प्रश्नाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी उत्तरात ही माहिती अंशत: खरे असल्याचे उत्तर दिले आहे. याच प्रश्नाच्या माध्यमातून राज्यातील एक शिक्षकी शाळांची माहितीही पुढे आली आहे. राज्यात प्राथमिक व उच्च प्राथमिक १ लाख ६ हजार ५२६ शाळांमधून १ कोटी ५९ लाख १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गतवर्षी या शाळांमधील ७७ हजार विद्यार्थ्यांची गळती झाली आहे. तर ३ हजार ७९६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला केवळ एकच शिक्षक उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे.
Previous Post Next Post