संजय गांधी निराधार संजय गांधी निराधार योजनेतील उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत सकारात्मक -राजकुमार बडोले


नागपूर १०/७/२०१८ - सामाजिक व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना, अपंग/दिव्यांगांना देण्यात येणारे अनुदान 600 रुपयांवरुन 1 हजार रुपये करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे असे सांगितले. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.

त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याबाबत इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री आणि आमदार यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील उत्पन्न मर्यादा 21हजाराहून अधिक वाढविण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे बडोले यांनी यावेळी सांगितले. उत्पन्नमर्यादा वाढविण्यासाठी अनेकवेळा लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी दिले.

सन 2018-19 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सदस्य अब्दुल सत्तार, राणा जगजित सिंह पाटील, हरिभाऊ जावळे,सुनील प्रभू, अबु आझमी,जयकुमार गोरे, पांडुरंग बरोरा, मनीषा चौधरी, अजय चौधरी, शरद सोनवणे, प्रा.वीरेंद्र जगताप,वैभव पिचड, बाबुराव पाचर्णे, डॉ.शशिकांत खेडेकर,वारिस पठाण आणि बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.

उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत सकारात्मक - राजकुमार बडोले
सामाजिक व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना, अपंग/दिव्यांगांना देण्यात येणारे अनुदान 600 रुपयांवरुन 1 हजार रुपये करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे असे सांगितले.

त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याबाबत इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री आणि आमदार यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील उत्पन्न मर्यादा 21 हजाराहून अधिक वाढविण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे बडोले यांनी यावेळी सांगितले. उत्पन्नमर्यादा वाढविण्यासाठी अनेकवेळा लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी दिले.

सन 2018-19 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सदस्य अब्दुल सत्तार, राणा जगजित सिंह पाटील, हरिभाऊ जावळे, सुनील प्रभू, अबु आझमी, जयकुमार गोरे, पांडुरंग बरोरा, मनीषा चौधरी, अजय चौधरी, शरद सोनवणे, प्रा.वीरेंद्र जगताप, वैभव पिचड, बाबुराव पाचर्णे, डॉ.शशिकांत खेडेकर, वारिस पठाण आणि बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.