इमारतीचा स्लॅब कोसळून मायलेक जखमी - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

12 July 2018

इमारतीचा स्लॅब कोसळून मायलेक जखमी


मुंबई - पावसाने मुंबईला तडाखा देऊन काहीशी उसंत घेतली असतानाच गुरुवारी पहाटे वांद्रे येथील शासकीय वसाहतीमधील इमारतीचा स्लॅब कोसळून मायलेक जखमी झाले. गुरुवारी पहाटे 4.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. वांद्रे येथील बी/295/5 ही शासकीय इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब पहाटेच्यावेळी झोपेत असताना कोसळल्याने इमारतीतील रहिवाशांची धावपळ उडाली. या दुर्घटनेत वैशाली सावंत (32) आणि नैतिक सावंत (8) हे सावंत कुटुंबातील दोघे जखमी झाले आहेत. दुर्घटनेत दोन्ही मायलेकरांच्या अंगाला आणि हाताला मार लागला. दोघांनाही उपचारासाठी तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी वरळीच्या पोलिस वसाहतीत स्लॅब कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर आता ही दुर्घटना घडल्याने शासकीय इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला झाला आहे. दरम्यान, काही महिन्यापूर्वी वरळीतील पोलीस वसाहतीतील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एक महिला गंभीर जखमी झाली होती. आता वांद्र्यातील या घटनेनंतर मुंबईतील शासकीय इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Post Top Ad

test