गणेशोत्सवासाठी एसटीच्या २२२५ बसगाड्या

JPN NEWS

मुंबई - चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २२२५ बसगाड्यांची सोय केली आहे, असे राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले..

या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून २२२५ बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या असून येत्या ९ ऑगस्ट (एक महिनाअगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसगाड्या लावण्यात आल्या आहेत. ग्रुप बुकिंगला (संघटित आरक्षण) १ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येत आहे. या ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. ८ ते ९ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी 'वाहन दुरुस्ती पथक' (ब्रेक डाऊन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !