डॉ. आंबेडकर स्मारकासाठी ११६ झाडे काढण्यास परवानगी


मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर इंदू मिलमधील स्मारक उभारण्याच्या कामात आड येणारी ११६ झाडे काढण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. यामुळे इंदूमिलमधील झाडे काढून त्या जागी स्मारकाचे बांधकाम करणे शक्य होणार आहे. मिल परिसरातील काढलेली झाडे त्याच भूखंडावर किंवा मनोरंजन मैदानात लावली जाणार आहेत.

दादर युनायटेड मिल नं ६, इंदू मिलच्या भूखंडावर ११. ४ एकर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या जागेवर एकूण २५० विविध प्रकारची झाडे आहेत. यात आंबा, शेवगा, सोनमोहोर, फणस, गुलमोहोर, रामफळ, पिंपळ अशा झाडांचा समावेश आहे. २५० मधील ११६ झाडे काढावी लागणार असून १३४ झाडे आहे तिथेच राहणार आहेत. स्मारकाच्या कामासाठी भूखंडावरील झाडे काढावीलागणार आहेत. एमएमआरडीएने ही झाडे काढण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे परवानगी मागितली होती. या प्रस्तावाला गुरुवारी वृक्षप्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने ही जागा डॉ. आंबेडकर स्मारकासाठी राज्य सरकारला हस्तांतरीत केली आहे. स्मारकाच्या उभारणीचे काम सुरु करण्यापूर्वी झाडे काढण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती.
Tags