जीर्ण झालेल्या मलनिस्सारण वाहिन्यांचे काम म्हाडा करणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

14 July 2018

जीर्ण झालेल्या मलनिस्सारण वाहिन्यांचे काम म्हाडा करणार

मुंबई - म्हाडाच्या ५६ वसाहती असून येथील जीर्ण झालेल्या मलनिस्सारण वाहिन्यांचे नूतनीकरण आणि उन्नतीकरणाचे काम आता म्हाडा प्राधिकरण करणार आहे. जीर्ण झालेल्या मलनिस्सारण वाहिन्यांचे नूतनीकरण आणि उन्नतीकरण कोणी करायचे याबाबत म्हाडा आणि महापालिकेमध्ये संभ्रम होता. याबाबत आमदार मंगेश कुडाळकर यांनी गेल्या चार वर्षापासून म्हाडा प्राधिकरणाबरोबरच गृहनिर्माणमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला असून वेळोवेळी बैठकाही घेतल्या आहेत. तसेच विधानसभेतही लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून म्हाडाने नूतनीकरणाचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे. कुर्ला नेहरूनगर, टिळक नगर, न्यू टिळक नगर, सुभाष नगर (चेंबूर) या वसाहतींच्या मलनिस्सारण वाहिनीच्या नूतनीकरणाचे आणि उन्नतीकरणाच्या कामासाठी अंदाजप्रत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून लटकलेले हे काम मार्गी लागणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

Post Top Ad

test