न्यायालयाने झापल्यानंतर रेल्वे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

05 July 2018

न्यायालयाने झापल्यानंतर रेल्वे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट


मुंबई - अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर पुलाची जबादारी रेल्वे आणि पालिकेने एकमेकांवर ढकलली होती. न्यायालयाने पालिका व रेल्वे प्रशासनाला झापल्यानंतर दोन्ही यंत्रणांना जाग आली आहे. शुक्रवारपासून रेल्वे हद्दीतील सर्व 445 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम पालिका आणि रेल्वेकडून संयुक्तरित्या हाती घेतले जाणार आहे. गुरुवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत रेल्वे अधिका-यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पुलाच्या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले. या घटनेनंतर पालिका - रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात सर्व पातऴीवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पुलाची जबाबदारी कुणाची यावरून वादही रंगला. यावरून सर्वोच्च न्यायालय़ाने फटकारल्यानंतर पालिका- रेल्वे प्रशासन कामाला लागली आहे. शुक्रवारी महापालिका मुख्य़ालयातील आयुक्तांच्या दालनात पालिका - रेल्वे प्रशासन यांची विशेष बैठक झाली. आयुक्तांसोबत झालेल्या या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन; पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्यासह मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अभियंता पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या दरम्यान अधिक प्रभावी समन्वयन साधण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या हद्दीमध्ये आरओबी, एफओबी, स्काय-वॉक इत्यादी प्रकारचे ४४५ पूल आहेत. या पूलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) शुक्रवार, 6 जुलैपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एकूण १२ चमू गठीत करण्यात आल्या आहेत. या चमूंमध्ये भारतीय प्रोद्योगिकी संस्थान (आय आय टी, मुंबई) येथील तज्ज्ञ, संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता व महापालिकेच्याही तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे.

पूलांची संरचनात्मक तपासणी करताना जे पूल सर्वात जुने आहेत, त्यांची संरचनात्मक तपासणी अगोदर करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, लोकमान्य टिळक पूल, एलफिन्स्टन पूल आदी तसेच महापालिका, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या मध्ये अधिक चांगले समन्वय नियमितपणे साधले जावे, या उद्देशाने आता यापुढे दर महिन्याला ठराविक दिवशी नियमितपणे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अभियंता व संबंधित रेल्वेचे वरिष्ठ अभियंता उपस्थित राहतील आणि महापालिका व रेल्वेच्या यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वयन साधण्याच्या दृष्टीने यथोचित कार्यवाही करतील.

पालिका हद्दीतील 274 पुलांचा अहवाल आठवडाभरात -
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील जुन्य़ा ब्रिटीशकालीन 274 पुलांचा मागील दोन वर्षापासून रखडलेला स्ट्रक्चरल अहवाल येत्या आठवडाभरात सादर केला जाणार आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम हाती घेतले जाणार आहे. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेले महापालिकेचे अधिकारी कामाला लागले आहेत.

Post Top Ad

test