भिवंडीत तीन मजली इमारतीचा भाग चाळीवर कोसळला - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

24 July 2018

भिवंडीत तीन मजली इमारतीचा भाग चाळीवर कोसळला


भिवंड - भिवंडीतील रसुला बाग भागातील तीन मजली इमारतीचा काही भाग शेजारच्या चाळीवर कोसळला. रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. इमारत शेजारच्या चाळीवर कोसळल्यानं काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले. यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत पाच जणांची सुटका केली आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. याशिवाय एनडीआरएफचं एक पथकदेखील घटनास्थळी दाखल झालं आहे. मरीयम शेख (9 वर्षे), शफियाबी युसूफ (60 वर्षे), मुन्नाभाई चावला (45 वर्षे), मेहरुनिसा शेख (40 वर्षे) आणि झरार अहमद शेख (45 वर्षे) अशी ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे.

Post Top Ad

test