जुहूबीचवर पाच जण बुडाले

मुंबई - समुद्राला भरती असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने गुरुवारी सायंकाळी जुहू चौपाटीवर पाच जण बुडाले. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले असून एकाचा मृतदेह मिळाला आहे तर तिघांचा शोध अद्याप घेतला जात आहे. 

फरदीन सौदागर (१७), सोहेल खान (१७), फैजल शेख (१७), नाझीर मेतर (१७) आणि वसिम खान (२२) हे पाच मित्र गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटी दरम्यानच्या दलदलीच्या भागात उतरले. भरती आणि समुद्र खवळलेला असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही व त्यातच सर्व जण बुडाले. वसीम खान (२२) याला चौपाटीवरील जीवरक्षकांनी वाचविले. जीवरक्षक, अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा रात्री उशिरापर्यंत यांचा शोध घेत होती. या दरम्यान नाझीर मेतर (१७) याला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून त्याला कूपर रुग्णालयात पाठवले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तिघांचा शोध अद्याप लागलेला नाही. या तिघांचा शोध घेण्यासाठी नेव्हीच्या चॉपरचा वापर केला जात आहे. 
Tags