
मुंबई - परळ पुलाजवळील डॉ. आंबेडकर मार्गावरील जलवाहिनी गुरुवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शिव़डी, केईएम, परळ परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. परिसरात पाणीच पाणी झाले. या घटनेनंतर परळ पुलावरुन जाणारी वाहतूक काही वेळ बंद केल्यामुळे पुलाखालील वाहतूक कोंडीचा त्रास पादचारी व वाहनधारकांना करावा लागला. गुरुवार रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल आणि शुक्रवारी सकाळपर्यंत या विभागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.