Type Here to Get Search Results !

मुंबईला पावसानं झोडपून काढलं.


मुंबई आणि परिसरात सोमवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार आजही कायम आहे. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर आणखी वाढला असून मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगराला पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी साचले. 

मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर खूप परिणाम झाला. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. रेल्वे उशिराने धावत आहेत. सावधगिरी म्हणून मुंबईतील अनेक शाळेंकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान भारतीय हवामान खात्याकडून ४ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच गेल्या २४ तासात कोकण, गोव्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पावसाची नोंद झाल्याची माहीती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

पावसाची नोंद - (दुपारी 3 वाजेपर्यंत)
कुर्ला येथे 208 मिमी, विक्रोऴी 192 मिमी, घाटकोपर 184 मिमी, परळ 176 मिमी, धारावी 174 मिमी, वडाळा 162 मिमी, मरोळ, 183, वर्सोवा 175 मिमी व बोरीवली येथे 172 मिमी पावसाची नोंद झाली

येथे पाणी साचले -
हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, मुख्याध्य़ापक भवन, सायन, शिंदेवाडी, भोईवाडा, परळ, कचरा पट्टी जंक्शन, धारावी, स्वस्तिक चेंबर्स, चुनाभट्टी, बंटर भुवन, चुनाभट्टी, पोस्टल कॉलनी, चेंबूर, परेश पार्क मार्केट, विक्रोळी, विक्रांत जंक्शन, पंतनगर, घाटकोपर, हवेली ब्रीज, घाटकोपर, परेश पार्क मार्केट, विक्रोऴी, कल्पना चौकी, भांडुप, घास कंपाऊंड, साकीनाका, अंधेरी सबवे, अंधेरी पोलीस ठाणे, मेट्रो पुलाखाली, चिंचोळी रोड, बांगुरनगर, ओबेरॅाय मॅाल, दिंडोशी, दुर्गानगर, जोगेश्वरी, एम. के रोड जंक्शन, अंधेरी या ठिकाणी पाणी साचले.

177 ठिकाणी पंप लावले -
पाणी साचलेल्या ठिकाणी पालिकेने 177 पंप लावले होते. यातील 37 पंपांनी साचलेले पाणी खेचून पाण्याचा निचरा केला. पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. विभागीय सहायक आयुक्तांसह सुमारे 750 अधिकारी व 5300 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

13 ठिकाणी घरांच्या भिंतीचा भाग कोसळला -
शहरात 4, पूर्व उपनगरांत 5, व पश्चिम उपनगरांत 4 अशा एकूण 13 ठिकाणी घराच्या भिंतीचा भाग कोसऴल्याच्या घटना घडल्या. सदर घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही.
..
मागील 24 तासांत कुलाबा 39 मिमी तर सांताक्रुझ 83 मिमी पावसाची नोंद झाली.
Tags

Top Post Ad

Below Post Ad