पीएमजीपी कॉलनीमध्ये शॉक लागून महिलेचा मृत्यू

मुंबई 7/7/2018 - मानखुर्द-घाटकोपर लिंकरोड येथील पीएमजीपी कॉलनीमध्ये शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला असून एक मुलगी यामध्ये जखमी झाली. उषा सावंत (४०) व समीधा सावंत (५) या दोघी मानखुर्द-घाटकोपर लिंकरोड येथील पीएमजीपी कॉलनीमध्ये राहतात. शनिवारी (७ जुलै) दुपारी १.४७ वाजताच्या सुमारास पीएमजीपी कॉलनीत शॉट सर्कीट झाल त्यात या दोघी जखमी झाल्या. त्यांना तातडीनं उपचारासाठी कोलेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारा रम्यान उषा सावंत यांचा मृत्यू झाला. तर समीधा सावंत हिची प्रकृतीत सुधारल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. 
Tags