Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पुमसे तायक्वांडो स्पर्धेत 13 पदकांवर एसटीए संघाची छाप


मुंबई / घाटकोपर (निलेश मोरे) - दक्षिण कोरियायेथील ग्वाजू येथे 15 जुलै ते 22 जुलै 2018 दरम्यान पार पडलेल्या चोसन अध्यक्षीय पुमसे तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धा 2018 मध्ये मुंबईतील सिद्धकला तायक्वांडो अकेडमी संघातील खेळाडूंनी 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 13 पदके मिळवली.

7 ते 40 वयोगटात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 40 वयोगटाखालील रेहान वांकवाला, अर्णव अत्रे, निशांत शिंदे, विनीत सावंत, सारा येवले यांना सुवर्ण पदक मिळवले. 10 वर्षाखालील तनिष्का वेल्हाळ, सौम्या देसाई, प्रांजना वांकवाला, फिया इनामदार, आर्यन येवले, गुंजन मिश्रा यांनी रौप्य पदक मिळवले. तर 7 वर्षाखालील विक्रांत देसाई आणि अंगद नाडकर्णी यांनी कांस्य पदक मिळवले. विशेष कौतुक म्हणजे सिद्धकला तायक्वांडो अकेडमी संघातील तनिष्का वेल्हाळचे कांस्य पदक मिळवल्या बद्दल विशेष अभिनंदन होत आहे . तनिष्का वेल्हाळ हिचे वय 5 वर्ष सुद्धा नसताना केवळ मिळालेला अनुभव आणि सरावाच्या जोरावर तनिष्काने 7 वर्ष वयोगटात चांगली कामगिरी करत स्पर्धेत मुलांना मागे टाकले. मुंबई उपनगर जिल्हा अध्यक्ष विनायक गायकवाड, सचिव संदीप येवले यांनी जयेश वेल्हाळ आणि त्यांच्या सिद्धकाला तायक्वांडो अकेडमी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom