व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

05 July 2018

व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय

नागपूर - दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

निवेदनाद्वारे माहिती देताना तावडे म्हणाले, दहावी उत्तीर्ण झालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने त्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. यास्तव या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेता,तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र विनाअनुदानित व्यावसायिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम 2015 याद्वारे स्थापन केलेल्या प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्याप्रमाणे आज दिनांक 5 जुलै रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे. या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच, विविध व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांकरिता विद्यार्थ्यांना आतापर्यंत मिळत असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनांचे लाभ कायम राहतील याकरिता देखील स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित करण्यात येत आहेत, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

Post Top Ad

test