बँकांमध्ये चोऱ्या करणाऱ्याला ६ वर्षांची शिक्षा

मुंबई - घाटकोपर व दादर येथील बँकांमध्ये चोऱ्या करणाऱ्या सराईत चोर रिषिकेश मणीनाथ बारिक याला विक्रोळी कोर्टाने ६ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. रिषिकेश याने २०१४ साली घाटकोपर येथील बँकेत रात्रीच्या वेळी चोरी करून ५५ लाखांची रोकड लांबवली होती. त्याचबरोबर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने दादर शिवाजी पार्क येथील दोन बँकांसह गोवंडी येथील बँकेत चोरी केल्याचा उलगडा झाला होता. घाटकोपर (प.) येथील कॅनरा बँकेच्या शाखेत २५ ऑगस्ट २०१४ च्या रात्री आरोपी रिषिकेश याने अंगात रेनकोट, हेल्मेट व छत्रीसह बँकेतील सेल्फ बनावट चावीने उघडून ५५ लाखांची रोखड चोरून नेली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त छेरिंग दोरजे, पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, वपोनि. राजाराम व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. याकुब मुल्ला, सपोनि. तेंडुलकर, प्रकाश सुतार, महेंद्र पुरी, योगेश देशमुख, भूषण पवार, दयानंद जाधव, नंदिनी बनसोडे आदींना करून आरोपी रिषिकेष याला ओडिशा राज्यातून अटक केली व त्याच्याकडून ५५ लाख रुपये हस्तगत केले.
Tags