महिला पत्रकारासमोर रिक्षाचालकाचे अश्लील वर्तन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2018

महिला पत्रकारासमोर रिक्षाचालकाचे अश्लील वर्तन


मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात महिलांना सध्या अनेक विकृतांचा सामना करावा लागत असून अशातच रिक्षातून घरी जाणाऱ्या एका पत्रकार महिलेसमोर रिक्षाचालकाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. ही धक्कादायक घटना महिला पत्रकाराने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रात्रीच्या वेळी मालाड येथून पीडित महिलेने घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यानंतर हा रिक्षाचालक अश्लील चाळे करू लागला. तसेच अचानक रस्त्यामध्येच रिक्षा थांबवून चालकाने महिलेसमोर पँट काढून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे धास्तावलेल्या महिलेने रिक्षातून पळ काढला. त्या वेळी जवळच काही जण उभे होते. मात्र, त्यातील एकही जण पुढे आला नसल्याचेही महिलेने सांगितले. ही घटना घडली, तेव्हा घर काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने वाईट प्रसंगातून बचावले असल्याचेही या पीडित महिलेने म्हटले आहे. सोशल मीडियावरील या घटनेच्या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी या पीडित महिलेचा जबाब घेत तक्रार नोंदवून घेतली आहे.

Post Bottom Ad