Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यातील कायदा, सुव्यवस्था सक्षम करा - मुख्यमंत्री


मुंबई - देशातील सर्वात उत्कृष्ट अशी गुन्हे आणि गुन्हे अन्वेषण नेटवर्क आणि यंत्रणा (सीसीटीएनएस) ही प्रणाली राज्याकडे आहे. या प्रणालीचा कायदा व सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच गुन्ह्यांची त्वरेने उकल होण्यासाठी प्रभावी वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर,गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल,पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही काळात पोलीस दलाने अतिशय उत्कृष्टपणे काम केले आहे. येत्या काळात सण, उत्सव व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने सतर्क रहावे. सीसीटीएनएस व डिजिटायझेशनद्वारे जमा केलेल्या माहितीचा उपयोग दाखल गुन्ह्यांच्या सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात यावेत. राज्य शासनाने गेल्या साडेतीन ते चार वर्षात पोलीस दलासाठी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना मालकीची घरे मिळावीत, यासाठी जिल्हा प्रमुखांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत. राज्य शासन पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom