डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

28 August 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्रंथालय संचालनालयामार्फत सन 2018-19 मध्ये देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 30 हजार रुपये, 20 हजार रुपये, 10 हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रोख रक्कम, शाल आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येकी महसुली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 15 हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. सन 2018-19 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ता व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दि. 28 सप्टेंबर,2018 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Post Top Ad

test