Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

तुमच्या व्यवसायावर गदा येऊ देणार नाही - राज ठाकरे

मुंबई - जिओ केबलनेटमुळे महाराष्ट्रातील स्थानिक केबल, इंटरनेट चालकांमध्ये सध्या व्यावसायिक असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील सुमारे ३०० ते ४०० केबलचालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी तुमच्या व्यवसायावर मी कुठल्याही प्रकारची गदा येऊ देणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी उभी आहे, असा दिलासा राज ठाकरे यांनी केबलचालकांना दिला.

जिओ फोनच्या यशानंतर जिओ आता केबल आणि इंटरनेट व्यवसायातही उतरली आहे. १५ ऑगस्टपासून जिओ केबल, इंटरनेटचे बुकिंगही सुरू झाले आहे. फोनच्या क्षेत्रात जिओने इतर कंपन्यांना अगदी जेरीला आणले आहे. या कंपन्या तर उच्च आर्थिक क्षमता असलेल्या आहेत. तीच जिओ आता लोकल केबल आणि इंटरनेटच्या व्यवसायात उतरत असल्याने साहजिकच स्थानिक पातळीवर केबल आणि इंटरनेट व्यवसाय चालवणाऱ्या ऑपरेटर्सच्या मनात धडकी भरली आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जिओने महाराष्ट्रातील स्थानिक केबलचालकांना सोबत घेऊन वाटचाल करावी. मनसे स्थानिक केबलचालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे जाहीर पत्र लिहिले होते. या भूमिकेलाच प्रतिसाद म्हणून सोमवारी सकाळी महाराष्ट्रातील केबलचालकांच्या ३०० ते ४०० प्रतिनिधींनी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी या वेळी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom