मोबाईल चोरणाऱ्याला अटक

मुंबई - रात्रीच्या वेळी झोपलेल्या इसमांचे मोबाईल चोरणाऱ्याला व त्याच्याकडून चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेच्या युनिट-५ च्या पोलिसांनी अटक केली आहे. सुमित धर्मराज उपाध्याय (३४) आणि राजेश इंद्रजीत यादव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पश्चिम उपनगरांत रात्रीच्या वेळी झोपलेले रिक्षाचालक, वॉचमन, कामगार आदींचे मोबाईल फोन व इतर वस्तू चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडत होत्या. वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या युनिट-५ च्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. बुधवारी मध्यरात्री कांदिवली पूर्व, लोखंडवाला फाऊंडेशन स्कूल, समतानगर येथून धर्मराज उपाध्याय याला ताब्यात घेतले. तपासात तो रात्रीच्या वेळी मोबाईल फोन चारू करून यादव याला विकत असल्याचे उघड झाले. या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत..
Tags