महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन - JPN NEWS

Web News Portal - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

02 August 2018

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 15 नोव्हेंबर 2018 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 31 ऑगस्ट 2018 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.

58 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 15 नोव्हेंबर, 2018 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 58 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धाची अंतिम फेरी जानेवारी 2019 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

नाट्य स्पर्धेसाठी रु.3 हजार इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्य संस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 31 ऑगस्ट, 2018 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.

मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- 32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे (020-20271301) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्ड टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-431005 (0240-2339055) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक,सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक,मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन,नागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

Post Bottom Ad

Responsive Ads Here