बॉलीवूड डान्सर अभिजीत शिंदेची आत्महत्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2018

बॉलीवूड डान्सर अभिजीत शिंदेची आत्महत्या

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने भांडुप येथील राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून भांडुप पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून, या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. 

अभिजीत शिंदेने बॉलीवूड अभिनेता सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, तुषार कपूर यांच्यासोबत अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. बुधवारी सकाळी घरातल्या सीलिंग पंख्याला लटकून अभिजीने आत्महत्या केली. त्याच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याने हा सर्व प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. अभिजीतला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रसिद्ध डान्सर आणि रॅपर अभिजीत शिंदेची पत्नी त्याला सोडून गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी राहत होती. त्यामुळे तो नैराश्यात होता. अभिजीतला ३ महिन्यांची मुलगी आहे. मात्र मुलीला भेटण्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला सक्त नकार दिल्याचे सांगण्यात येतेय, तर दुसरीकडे त्याच्याकडे सध्या कोणतेही काम नसल्याने त्याला त्याचीही काळजी वाटत होती. याच सगळ्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी अभिजीतचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्या करण्याआधी अभिजीतने सुसाईट नोट लिहिली होती. त्यात त्याने त्याच्या बँकेचे अकाऊंट आपल्या मुलीच्या नावे केले असल्याचे म्हटले आहे..

Post Bottom Ad