Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

तबेल्यांच्या विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करा - राजूल पटेल


मुंबई - मुंबईतील तबेल्यांच्या विकासासाठी चटईक्षेत्र निर्देशांक वाढवून देता येईल आणि तबेल्यांच्या जागांच्या आरक्षणात आवश्यक ते बदल करता येईल, अशा रीतीने मुंबईसाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आली आहे. 

मुंबईत अंदाजे ६४१ तबेले असून, त्यांचे क्षेत्रफळ सुमारे ६४ हेक्टर इतके आहे. प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड व दहिसर परिसरात तबेल्यांची संख्या लक्षणीय असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व तबेले मुंबईबाहेर हलवणे बंधनकारक आहे. हे तबेले निवासी ,व्यावसायिक आणि ना विकास क्षेत्र यामध्ये स्थित आहे. विकास नियंत्रण नियमावलीत तबेल्यांच्या विकासासाठी केवळ ०.३३ एवढा अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक देण्यात आला आहे. हा चटईक्षेत्र निर्देशांक तबेलाधारकांना व विकासकांना परवडत नसल्यामुळे तबेल्यांच्या जागांचा विकास होत नाही. त्याप्रमाणे तबेल्यांच्या जागांवर विकास नियोजन आराखड्यात ज्या उद्दिष्टांसाठी आरक्षण आहे त्याच आरक्षणासाठी त्या जागा विकसित करण्याचे बंधन आहे.

त्यामुळे अन्य उद्दिष्टांसाठी त्याचा विकास करता येत नाही. कित्येक वर्षांपासून तबेल्यांचे परवाने देणे बंद केल्यामुळे पालिकेला त्यापासून उत्पन्न मिळत नाही. तसेच तबेल्यांमधील मलमूत्र व एकंदरीत साफसफाईचा अभाव, यामुळे तबेल्यांच्या परिसरात रोगराईचा प्रसार व प्रदूषणाचा धोका असून, तबेल्यांच्या जागांचा विकास होणे आवश्यक आहे. म्हणून मुंबईत तबेल्यांच्या विकासाठी चटईक्षेत्र निर्देशांक वाढवून देता येईल आणि तबेल्यांच्या जागांच्या आरक्षणात आवश्यक ते बदल करता येईल, अशा रीतीने मुंबईसाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom