कॉमेडी अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2018

कॉमेडी अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन


मुंबई - मराठी कॉमेडी अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात निधन झाले आहे. प्रकृती खालावल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंतयात्रा निघणार आहे.

विजय चव्हाणांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या 'वहिनीची माया' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. नुकतेच राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. 

Post Bottom Ad