पालिकेच्या रुग्णालयांतील आंतररुग्णांना 'पपई' देण्यास नकार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

27 September 2018

पालिकेच्या रुग्णालयांतील आंतररुग्णांना 'पपई' देण्यास नकार


मुंबई - डेंग्यू रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी झाल्यानंतर त्या वाढण्यासाठी संबंधिताला पपई खाण्यास द्या, असा सल्ला काही डॉक्टर देतात आणि सोशल मीडियावरदेखील ही माहिती 'व्हायरल' होत असते, परंतु मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांतील आंतररुग्णांना 'पपई' हे फळ देण्यास पालिकेने नकार दिला आहे. रोगजंतूंचा प्रादुर्भाव तसेच जीवनसत्त्वांचा ऱ्हास होण्याची शक्यता यामागे व्यक्त केली आहे.

पालिकेच्या ३ प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये औषधोपचारांसाठी दाखल होणाऱ्या आंतररुग्णांना सकाळ/सायंकाळच्या आहारात डॅ्रगन फ्रुट, किवी किंवा पपई आदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पौष्टिक फळांचाही समावेश करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका सुषम सावंत यांनी केली होती. महापालिका रुग्णालयांतील बहुतांशी रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेली पौष्टिक फळे विकत घेणे त्यांना परवडत नाही, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पौष्टिक फळांचाही समावेश करण्यात यावा, अशी ठरावाची सूचना त्यांनी मांडली होती. त्याला प्रियांका मोरे यांनी अनुमोदन दिले होते.

'महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांकरता दाखल करून घेतलेल्या रुग्णांना आहारतज्ज्ञांच्या मागदर्शनाखाली पौष्टिक पदार्थ, भाज्या आदीचा समावेश असलेले जेवण पुरवले जाते. केईएम रुग्णालयातील आहारतज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार रुग्णांना महाराष्ट्रात पिकणारी हंगामी तसेच बारमाही फळे देणे उचित असून, 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नॅशनल इ्स्टिटट्यूट ऑफ न्यूट्रिशिन'च्या 'इंडियन फूड कम्पोझिशन टेबल'मध्ये 'ड्रॅगन फ्रुट आणि किवी या फळांचा उल्लेख नसल्याने या फळांमधील पौष्टिक घटकांची माहिती उपलब्ध नाही आणि केईएम व नायर रुग्णालयांतील आहारतज्जांच्या अभिप्रायानुसार 'पपई' हे फळ कापून देताना रोगजंतूंचा प्रादुर्भाव तसेच जीवनसत्त्वांचा ऱ्हास होण्याची शक्यता असल्याने पपई हे फळ आंतररुग्णांना पुरवणे सोयीस्कर होणार नाही,' असे प्रशासनाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

Post Top Ad

test