Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आरपीएफ पोलिसांकडून तोतया रेल्वे अधिकाऱ्याला अटक


मुंबई - बोरिवलीच्या आरपीएफने महिला प्रवाशांना गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक केली आहे. पियुष शर्मा (३१) असे आरोपीचे नाव असून, रेल्वे अधिकारी असल्याचे भासवून त्याने प्रवाशांंकडून पैसे उकळल्याचे उघड झाले आहे.

शर्मा हा वसई (प.) येथील विद्यामंदिर मार्ग येथे राहणारा आहे. शर्मा याला बोरिवलीच्या आरपीएफने बोरिवली तिकीट बुकिंग ऑफिसजवळून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची उलटत तपासणी केली असता शर्मा पोलिसांना बोरिवली रेल्वे स्थानकात कशाला आला आहे, याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याला आरपीएफ चौकीवर आणून त्याचा पोलिसांनी सखोलपणे तपास सुरू केला. २१ ऑगस्टच्या बोरिवली स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शर्मा संशयास्पदरित्या रेल्वे स्थानकात वावरत असल्याचे दिसून आले. तसेच त्याने मनीषा नावाच्या एका महिला प्रवाशाकडून पैसे काढून घेऊन तिला आरपीएफ चौकीवर बोलावून घेतले आणि तिने तिच्याकडून सुमारे १४ हजार रुपये घेतले असल्याचे सांगितले. आणखी एका तपासात असे आढळून आले की, ५ सप्टेंबर रोजी भाईंदर येथील शारदा दुबे या महिलेला २,९०० रुपये दंड ठोठावला. मात्र, शारदा यांनी त्याला ओळखले. पुढील चौकशीत शर्मा याने दोन अन्य प्रवाशांकडून १६५० रुपये घेतल्याचे मान्य केले. शर्मा याच्यावर फसवणूक आणि तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा ताबा बोरिवली शहर पोलिसांकडे देण्यात आला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom