Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वाहन चोरीचा पर्दाफाश, दोन कोटींची मालमत्ता जप्त


मुंबई - मुंबईसह उत्तर प्रदेशातील वाहन चोरीचा क्राईम ब्रँचच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश करून वाहन चोरीतील मास्टर माइंसडसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अहमद बशीर अहमद शेख या मास्टर माइंडसह मोहसीन अशरफ बलोच या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

मालमत्ता कक्षाने यापूर्वी हजरत अली फक्रुद्दीन खान आणि अयुब अली शेख ऊर्फ गुड्डू या दोघांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत अहमद बशीर आणि मोहसीन बलोच या दोघांचे नाव समोर आले होते. त्यानुसार, पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरुवात केली असता, यातील मोहसीन बलोच हा चोरी केलेली स्विफ्ट कार घेऊन जोगेश्वरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून मोहसीन बलोचला अटक करण्यात आली, तर अहमद बशीरने तेथून पलायन केले. यादरम्यान, मोहसीन बलोचने अहमद बशीरसह वालीव पोलीस ठाणे, तसेच विरार पोलीस ठाणे अंतर्गत दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच बशीरची माहितीदेखील पोलिसांना दिल्यानंतर त्याचा माग काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. त्यातच तो नागपाडा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून बशीर अहमदला अटक केली. या वेळी त्याच्याकडून दोन वाहने, एक मोटर लॉरी तसेच १ कोटी ८१ लाखांच्या दरोड्याची रक्कम जप्त करण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले. तसेच यादरम्यान या सराईत गुन्हेगारांनी मोटार लॉरीसह चोरलेले ३१ टन कॉपर हे गुजरात राज्यात १ कोटी ८१ लाखांना विकले होते. त्यानुसार, पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन जप्त केलेल्या कॉपरसह १ कोटी, ८१ लाख रुपये जप्त केले. अटक आरोपींना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याचे क्राईम ब्रँचचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom